शिवप्रेमींना गडावर जाण्यासाठी रोप वेची सुविधा
कोरोनाच्या काळात दोन वर्षात तिथं राज्याभिषेक सोहळा झाला नव्हता. यंदा शिवप्रेमींमध्ये तो उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच संभाजी राजे आज काय भूमिका जाहीर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दोन वर्षानंतर होत असलेल्या राज्याभिषेक सोहळ्यास राज्यातील मोठ्या संख्येने शिवप्रेमी रायगडावर दाखल झाली आहे. रायगडावर येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींनी आपली काळजी घ्यावी, तसेच नियमाचं पालन करावं असं संभाजी राजेंनी आवाहन केलं आहे. काल रात्रीपासून लोक जमायला सुरुवात झाली आहे. रायगडवरील सगळा परिसर सजवण्यात आला असून आज तिथं राज्याभिषेक सोहळा होणार आहे. तसेच लोकांना राजगडावर जाणास रोप वे ची व्यवस्था आहे. अनेक शिवप्रेमी रायगडावर जाण्यासाठी रोप वे चा वापर करीत आहेत. कोरोनाच्या काळात दोन वर्षात तिथं राज्याभिषेक सोहळा झाला नव्हता. यंदा शिवप्रेमींमध्ये तो उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच संभाजी राजे आज काय भूमिका जाहीर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 06, 2022 10:27 AM