“मविआत दहा मुख्यमंत्री असून विधानसभेपर्यंत 50 मुख्यमंत्री दिसतील”, भाजप नेत्याचा टोला
राज्यातील विधानसभा निवडणुकीला १ वर्ष बाकी असताना सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्याचे 'भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर्स लावले जात आहेत. दरम्यान राज्यातील भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरवरून भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
अहमदनगर: राज्यातील विधानसभा निवडणुकीला 1 वर्ष बाकी असताना सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अशातच कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्याचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर्स लावले जात आहेत. दरम्यान राज्यातील भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरवरून भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. “ज्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले ते निवडून येतील की नाही याची खात्री नाही. म्हणून मुख्यमंत्री पदाची घोषणा करायची आणि मत मिळवायची असा प्रकार सुरु आहे. तसेच पुन्हा आमदार होऊ का असे स्वप्न पाहण्याचे काम होत आहे. आज महविकास आघाडीत दहा मुख्यमंत्री असून विधानसभेपर्यंत 50 मुख्यमंत्री दिसतील, अशी शंका येत असल्याच” उपरोधी टोला कर्डिले यांनी लगावलाय.