समर्थ रामदास स्वामीमुळेच शिवाजी महाराज घडले, योगी आदित्यनाथ यांच्या विधानाने वाद

| Updated on: Feb 11, 2024 | 9:40 PM

समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. भाजपाचे नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी यांनीच घडविल्याचे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांनी शिवाजी महाराजांच्या गुरु या जिजाऊ माताच असल्याचे म्हटले आहे.

Follow us on

पुणे | 11 फेब्रुवारी 2024 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळेच घडले असे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. सर्मथ रामदास स्वामी यांनी शिवरायांना या भूमीत घडविले आणि पुढे त्यांनी पराक्रम केला. रामदास स्वामींनी जे कार्य केले तेच आज स्वामी गोविंद देवगिरी महाराज सनातन धर्मासाठी करीत असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे अयोध्येत याच गोविंद देवगिरी महाराजांनी मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्याने वाद निर्माण झाला होता. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहीत पवार यांनी जी मंडळी आता भाजपाचा सोबत गेली आहेत त्यांना योगी आदित्यनाथ यांचे हे विधान मान्य आहे का ? असा सवाल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु राजमाता जिजाऊ याचे होत्या असे सांगत योगी आदित्यनाथ यांनी इतिहासाचा नीट अभ्यास करावा असे म्हटले आहे.