VIDEO | खासदार राऊत यांना शंभूराज देसाई यांचा अल्टीमेट, दिला असाही इशारा
शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवेला आहे की आमची इथं गळचेपी होते असं गौप्यसफोट केला होता. त्यावरून आता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांनी यांच्यावर पलटवार करताना त्यांना अल्टीमेट दिला आहे.
सातारा : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटातील आमदार आणि खासदारांबद्दल खळबळजनक दावा केला होता. शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार आपल्या संपर्कात आहेत. तर शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवेला आहे की आमची इथं गळचेपी होते असं गौप्यसफोट केला होता. त्यावरून आता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांनी यांच्यावर पलटवार करताना त्यांना अल्टीमेट दिला आहे. तसेच माझ्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे, असे केलेले वक्तव्य धादांत खोटे आहे. ‘राऊत यांनी दोन दिवसांत आपले म्हणणे मागे घेतले नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू,’ असा इशाराच देसाई यांनी दिला. तसेच ‘गेल्यावर्षी विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आम्ही सुरतला गेलो तेव्हापासून उध्दव ठाकरे किंवा ठाकरे परिवाराशी अर्धा सेकंदही बोलणं झालेलं नाही. तसेच कोणा त्रयस्थामार्फतही निरोप दिलेला नाही. राऊत यांनी केलेले वक्तव्य 1001 टक्के खोटे आहे. महाविकास आघाडीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचे त्यांच्याकडून असं वक्तव्य केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे.