भाजपच्या ऑफरवर अमोल कोल्हे यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, ऑफर एकच…
उलट तुम्ही एखादी चांगली बातमी केली आणि दुसऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी तुमचं कौतुक केलं म्हणून तिकडं जाणार का असा सवार पत्रकारांना केला. तसचे पंतप्रधानांनी असं लोकसभेत कौतुक केलं ही अभिमानाचीच गोष्ट आहे
सातारा : सध्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याची खूप चर्चा आहे. अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यात प्रमुख भूमिकेत आहेत. या महानाट्याचे प्रयोग राजयभर सुरू असून तो आता साताऱ्यात होणार आहे. यापुर्वी त्यांनी आज पत्रकार परिषद घेत राजकीय प्रश्नांना देखील उत्तरं दिली. यावेळी कोल्हे यांना भाजप प्रवेश करणार का? तशी ऑफर आहे का असा सवाल करण्यात आला होता. त्यावर कोल्हे यांनी, लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलेल्या कौतुकाचं आणि ऑफरचा काही संबंध नाही. उलट तुम्ही एखादी चांगली बातमी केली आणि दुसऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी तुमचं कौतुक केलं म्हणून तिकडं जाणार का असा सवार पत्रकारांना केला. तसचे पंतप्रधानांनी असं लोकसभेत कौतुक केलं ही अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु ही काही ऑफर नाही, कोण म्हणतंय ही ऑफर आहे? मुळात ऑफर तर यायला पाहिजे. तर अमोल कोल्हे म्हणाले, सध्या ऑफर एकच, शिवपुत्र संभाजी हे नाटक पाहायला या, ते जास्त महत्त्वाचं आहे. राजकारण, राजकीय पदं या गोष्टी केवळ पाच वर्षांसाठी असतात. परंतु शिवपुत्र संभाजी या महानाट्याद्वारे लोकांच्या, लहान मुलांच्या काळजावर जे कोरलं जाणार आहे ते जास्त शास्वत आहे.