छातीवर बाळासाहेबांचा टॅटू, शंख वाजवत शिवसैनिक कोणाच्या मेळाव्यात?

| Updated on: Jun 20, 2023 | 8:47 AM

ठाकरे गटाने शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी मेळावा आयोजित केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्यात शिवसैनिकांची अफाट गर्दी पाहायला मिळाली.

मुंबई : ठाकरे गटाने शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी मेळावा आयोजित केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्यात शिवसैनिकांची अफाट गर्दी पाहायला मिळाली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. आमच्यासाठी एकत पक्षप्रमुख आहेत, ते म्हणजे उद्धव ठाकरे. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. तसेच जे राहिले ते मावळे उडून गेले ते कावळे, अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली. शिवसैनिकांच्या गर्दीत एका मावळ्याने आपल्या छातीवर बाळासाहेबांचा टॅटू काढला होता. बाळासाहेब यांचं निधन झाल्यानंतर मी हा टॅटू काढला आहे, आणि ते नेहमी माझ्यासोबत असतात, असं तो म्हणाला.

Published on: Jun 20, 2023 08:47 AM
‘निणंद्याला बारा बुद्ध्या’, खोचक म्हणीतून कायंदे यांच्यावर सुषमा अंधारे यांचा पलटवार
‘स्वाभिमान दिन की लाचार?’ ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदे गटाला वर्धापन दिनावरून टोला