Shivsanwad Yatra: ही गद्दारी होती उठाव नव्हता- आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेला (Shivsanwad yatra) सुरवात केली आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गट आणि भाजप सरकारवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे गटाकडून बंडखोरीला उठाव असे संबोधले जात आहे त्यावर हा उठाव नाही तर गद्दारी आहे असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यात अनेक समस्या आहेत […]
आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेला (Shivsanwad yatra) सुरवात केली आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गट आणि भाजप सरकारवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे गटाकडून बंडखोरीला उठाव असे संबोधले जात आहे त्यावर हा उठाव नाही तर गद्दारी आहे असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यात अनेक समस्या आहेत पण दोन जणांचे मंत्रिमंडळ असल्याने प्रश्न कसे सुटणार असा टोलाही त्यांनी लगावला आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे लिहून घ्या असेही ते यावेळी म्हणाले. जे सोडून गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, लाज असेल तर राजीनामे द्या आणि निवडून दाखवा असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
Published on: Jul 21, 2022 02:12 PM