Shivsena: राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेत नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती, हे तीन नेते मांडणार पक्षाची बाजू
प्रवक्तेपदाच्या नियुक्तीसाठी काल हालचालींना वेग आला होता. मुंबईतून अरविंद सावंत आणि दिल्लीतून प्रियांका चतुर्वेदी यांच्या नावाची पूर्वीपासूनच चर्चा होती. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे शिवसेनेला नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती करावी लागली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी इडीने अटक केल्यानंतर प्रवक्ते पदाची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. अरविंद सावंत आणि नीलम गोऱ्हे हे मुंबईतून पक्षाची बाजू मांडणार आहे. तर दिल्लीत प्रवक्तेपदाची जबाबदारी प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडे दिलेली आहे. प्रवक्तेपदाच्या नियुक्तीसाठी काल हालचालींना वेग आला होता. मुंबईतून अरविंद सावंत आणि दिल्लीतून प्रियांका चतुर्वेदी यांच्या नावाची पूर्वीपासूनच चर्चा होती. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे शिवसेनेला नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती करावी लागली. अरविंद सावंत हे जुने शिवसैनिक असून एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी वेळोवेळी माध्यमाशी पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली’होती.
Published on: Aug 04, 2022 10:26 AM