shivsena- BJP : भाजपचे 8 आणि शिंदे गटाचे 5 जण शपथ घेणार?
मंत्री मंडळाच्या विस्तारात भाजपचे 8 तर शिवसेनेचे 5 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीत आहेत. तेथे मोठ्या नेत्यांच्या भेटी या दोघांच्याकडून घेतल्या जात आहेत. हे दोघेही परत आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार आहे.
मुंबईत – राज्यात नुकतेच शिवसेना – भाजप युतीचे ( shivsena- BJP)नवीन सरकार स्थापना झाले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून अनुक्रमे एकनाथ शिंदे(Eknath shinde) व देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर विधानसभेच्या सभागृहातही बहुमताची चाचणी पारपडली असून शिवसेना व भाजप यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. त्यानंतर आता येत्या 12 किंवा 13 जूनला मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाणारा असल्याची माहिती समोर आली आहे. खात्रीलायकी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मंत्री मंडळाच्या विस्तारात भाजपचे 8 तर शिवसेनेचे 5 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीत(Delhi) आहेत. तेथे मोठ्या नेत्यांच्या भेटी या दोघांच्याकडून घेतल्या जात आहेत. हे दोघेही परत आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार आहे.