आतुरता उद्धव साहेबांच्या गर्जनेची, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे पोस्टर व्हायरल…
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद उफाळून आला आहे.
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद उफाळून आला आहे. त्यानंतर दसरा मेळाव्यावरुन पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार, आणि खरी शिवसेना कोणाची असाही वाद सुरु असतानाच आता आतुरता उद्धव ठाकरे साहेबांच्या गर्जनेची…अशा अशायाचे पोस्टर आता व्हायरल झाले आहे. मात्र या पोस्टरबद्दल अजून शिवसेनेकडून कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Sep 18, 2022 02:06 PM