धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

| Updated on: Jan 30, 2023 | 7:54 AM

धनुष्यबाण चिन्ह नक्की कुणाचं? याबाबत निवडणूक आयोगासमोर आज दोन्ही गट आपलं लेखी म्हणणं मांडणार आहेत. पाहा व्हीडिओ...

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात अनेक बदल झाले. पक्षाचं चिन्ह असणारं धनुष्यबाण नक्की कुणाचं? शिंदेगट की ठाकरेगटाचं? हा प्रश्न उपस्थित झाला. या चिन्हाबाबतच्या निर्णयासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपतेय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह नक्की कुणाचं? याबाबत निवडणूक आयोगासमोर आज दोन्ही गट आपलं लेखी म्हणणं मांडणार आहेत. प्रत्यक्ष युक्तिवादानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. निवडणूक आयोग आज निर्णय देणार की निर्णय राखून ठेवणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Published on: Jan 30, 2023 07:54 AM
2024 ला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; ‘या’ वरिष्ठ नेत्याला विश्वास
बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नाशिकच्या निफाडमधील घटना