Video : ‘त्या’ सुटकेचा थरार, Kailas Patil यांनी सांगितला ‘तो’ कटू अनुभव

| Updated on: Jun 23, 2022 | 3:03 PM

शिवसेनेत (Shivsena) मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलंय. विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोमवारी रात्रीच एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसही सूरतला गेले. तिथे लि मेरेडियन हॉटेलमध्ये हे आमदार मुक्कामी आहेत. मात्र, कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) शिंदे गटातून निसटण्यात यशस्वी ठरले आहेत. शिंदे […]

शिवसेनेत (Shivsena) मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलंय. विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोमवारी रात्रीच एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसही सूरतला गेले. तिथे लि मेरेडियन हॉटेलमध्ये हे आमदार मुक्कामी आहेत. मात्र, कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) शिंदे गटातून निसटण्यात यशस्वी ठरले आहेत. शिंदे यांच्यासोबत कैलास पाटील हे देखील गुजरातच्या दिशेनं निघाले होते. मात्र, त्यांना शंका आली आणि त्यांनी शिताफीने शिंदे आणि अन्य आमदारांपासून आपली सूटका केली आणि परत मुंबईत पोहोचले आहेत, आज त्यांनी आपला अनुभव शेअर केला.

Published on: Jun 23, 2022 02:59 PM
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 2 PM | 23 June 2022
आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांचं शक्तिप्रदर्शन, आमदारांची घोषणाबाजी