Gulabrao Patil | कोणाचे ठराव कोणत्या गावातून हे तपासावे लागेल

Gulabrao Patil | ‘कोणाचे ठराव कोणत्या गावातून हे तपासावे लागेल’

| Updated on: Jun 18, 2022 | 12:34 AM

आमदार चिमणराव पाटील यांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री गुलाबराव पाटलांनीही टोला लगावलाय, मला सहकार मधला फार अभ्यास नाही, चिमणराव पाटील माझे मार्गदर्शक आहे, मागच्या काळात कोणाचे ठराव कोणत्या गावातून होते हे तपासावे लागेल, असं म्हणत पालकमंत्र्यांनी आमदार चिमणराव पाटलांना टोला हाणला.

जळगाव : दूध संघासाठी अनेक नेत्यांचे ठराव स्वतःच्या गावातून नाहीत, त्यामुळे आमदार चिमणराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही ठराव जळगाव तालुक्यातील वडली येथून करण्यात आलेला आहे. पालकमंत्र्यांचा ठराव स्वतःच्या गावातील नसल्याने आमदार चिमणराव पाटील यांनी पालकमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. ज्यांना स्वतःच्या गावात दूध डेअरी चालवता येत नाही, अशा लोकांना दूध संघात प्रतिनिधित्व करण्याचा नैतीक अधिकार आहे का? असा सवालही आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, आमदार चिमणराव पाटील यांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री गुलाबराव पाटलांनीही टोला लगावलाय, मला सहकार मधला फार अभ्यास नाही, चिमणराव पाटील माझे मार्गदर्शक आहे, मागच्या काळात कोणाचे ठराव कोणत्या गावातून होते हे तपासावे लागेल, असं म्हणत पालकमंत्र्यांनी आमदार चिमणराव पाटलांना टोला हाणला.

Published on: Jun 18, 2022 12:34 AM
अग्निपथ योजना… उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि तेलंगणात तरुणांचं हिंसक आंदोलन; रेल्वे स्टेशनला आग, रेल्वे गाड्याही जाळल्या
Nitin Gadkari visit Kelkar Museum | नितीन गडकरींची केळकर वस्तुसंग्रालयाला भेट दिली