वॉशिंग पावडर भाजपा…

| Updated on: Aug 03, 2022 | 11:04 PM

मनीषा कायंदे यांचे हे ट्विट चर्चेचा विषय ठरले होते. भाजपला वॉशिंग पावडर म्हटले गेल्याने शिवसेना-भाजप वाद आणखी रंगणार असल्याचेच दिसत आहे.

शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी आज वादग्रस्त ट्विट केले आहे, त्यामुळे त्यांच्या या ट्विटची आज दिवसभर चर्चा करण्यात आली. मनीषा कायंदे यांनी ट्विट करताना त्यामध्ये त्या म्हणाल्या आहेत. वॉशिंग पावडर भाजप असं ट्विट त्यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात आज जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात असल्याने भाजपचेच हे षढयंत्र असल्याची टीका शिवसेनेकडून वारंवार केली जात आहे. त्यातच संजय राऊत आणि त्यांचा भाऊ प्रवीण राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे. त्यामुळे मनीषा कायंदे यांचे हे ट्विट चर्चेचा विषय ठरले होते. भाजपला वॉशिंग पावडर म्हटले गेल्याने शिवसेना-भाजप वाद आणखी रंगणार असल्याचेच दिसत आहे.

Published on: Aug 03, 2022 11:02 PM
ढगफुटीनं झालं पाणीच पाणी…
Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतांच्या जामिनावर आज सुनावणी, जेल की बेल?