‘ईडी घुसवून केंद्र विरोधकांवर दडपण आणून आपल्याकडे खेचतयं’; राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Aug 10, 2023 | 1:00 PM

त्यांनी त्या पॉडकास्टमध्ये बेधडकपणे ईडी ही दहशतवादी संघटना, बापाचं घर असल्यासारखं आपल्या घराचा ताबा घेतात अशीही टीका केली होती. त्यावरून आता जोरदार राजकारण सुरू असतानाच आता पुन्हा एकदा राऊत यांनी यावरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2023 | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीवर जोरदार टीका करताना देशात ईडीने दहशत निर्माण केल्याचे म्हटलं आहे. राऊत यांनी ही टीका शिवसेना पॉडकास्टमध्यील मुलाखतीत केली होती. त्यांनी त्या पॉडकास्टमध्ये बेधडकपणे ईडी ही दहशतवादी संघटना, बापाचं घर असल्यासारखं आपल्या घराचा ताबा घेतात अशीही टीका केली होती. त्यावरून आता जोरदार राजकारण सुरू असतानाच आता पुन्हा एकदा राऊत यांनी यावरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी, या देशात ईडीने जी दहशत निर्माण केली आहे. ज्या गोष्टीचा तपास पोलीस, राज्याचा अर्थिक विभाग करू शकतो, तिथे ईडी घसवली जातेय. विरोधकांवर दडपण आणून आपल्याकडे खेचायचे काम केंद्राकडून केले जात आहेत. हा एक प्रकार म्हणजे टेररिझम आहे. हे मी सांगत नाहीये. तर ज्येष्ठ कायदे पंडित हरिश साळवे यांनी म्हटलं आहे. ते ही कोर्टात त्यांनी सांगितलं आहे. ईडीला आवरलं नाही तर देशात अराजक निर्माण होईल असं त्यांनी म्हटलं होतं. मी तर तेच रिपीट केलं आहे, असं ते म्हणाले.

Published on: Aug 10, 2023 01:00 PM
‘जादू की झप्पी तसं जादूका किस’; राहुल गांधी यांच्या फ्लाइंग किसवर राऊत यांची प्रतिक्रिया, भाजपवर टीकास्त्र
‘राजू शेट्टी शेपटीला चिंध्या बांधून कार्यकर्त्यांना जाळतायत’; शेट्टी यांच्यावर शेतकरी नेत्याची बोचरी टीका