SANJAY RAUT : ही कसली मर्दुमकी? राहुल गांधी यांच्या यात्रेतून संजय राऊत यांचा शिंदे गटाला सवाल
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेने चांगला संदेश दिला आहे. देशात चांगली वातावरण निर्मिती झाली आहे.
जम्मू काश्मीर : काँग्रेस नेते राहुल गांधी ( RAHUL GANDHI ) यांची भारत जोडो यात्रा ( BHARAT JODO YATRA ) जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाली आहे. भर पावसातही राहुल गांधी यांची ही यात्रा सुरु आहे. या यात्रेमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत ( SANJAY RAUT ) सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यापूर्वी संजय राऊत यांनी काँग्रस नेत्यांची भेट घेतली.
शिंदे गटाच्या नेत्यांनी राऊत जम्मूला जात आहेत. त्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानलाच जावे, असा टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी पाकिस्तानचे तोफ गोळे इथे पडत असतात. अतिरेक्यांचे हल्ले होतात. तिथे बसून खोक्याचे राजकारण करणे सोपे आहे. आम्ही मोदींची माणसे आहे असे सांगणे म्हणजे काही मर्दुमकी नाही. पण स्वतः मोदी यांनी जी आश्वासने दिली आहे ती पूर्ण झालेली नाहीत, असा टोला लगावला.
शिवसेना जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक लढविणार आहे. काल पठाणकोटला जमलेल्या हजारो तरुणांच्या हातात मशाली होत्या. मशाल हे तर शिवसेनेचे चिन्हं आहे. तरुणांच्या हाती या धगधगत्या मशाली पाहून भरून आले असेही राऊत म्हणाले.