तुम्हाला कुणाकडून, किती, कधी आणि कोणत्या गाडीतून खोके मिळाले सांगितलं तर…; शीतल म्हात्रे यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा

| Updated on: Feb 27, 2023 | 7:41 AM

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरेगटाचे नेते आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलंय...

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरेगटाचे नेते आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी खोक्यांचा संदर्भ दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलंय. तुम्हाला कुणाकडून खोके मिळाले. किती खोक म्हणाले. कधी मिळाले आणि कोणत्या गाडीतून खोके मिळाले सांगितलं तर तुम्हाला तोंड लपवून फिरावं लागेल. तुम्ही जनसंवाद यात्रा किंवा इतर कार्यक्रम करता तेव्हा त्यासाठी पैसे लागतात. हे पैसे कुठून येतात?, हेही लोकांना समजायला हवं. मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना सांभाळून बोला, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

Published on: Feb 27, 2023 07:34 AM
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी मोठी बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
सुषमाताई, तुम्ही आता कुठे ठाकरेंना ओळखता?, हळूहळू खरे रंग समोर येतील, आम्ही मात्र…; शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य