Special Report | ‘शिवसेनेत गद्दार नाही, विधान परिषद जिंकणारच

| Updated on: Jun 19, 2022 | 9:53 PM

द्धव ठाकरे यांनी गद्दारांची मला माहिती आहे, त्यामुळे आता यावेळी गद्दारी कोणी करणार नाही असा विश्वासही त्यानी यावेळी व्यक्त केला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला त्यानंतर विधान परिषदेचेही उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेसारखा धगाफटका होऊ नये याची पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळेच पूर्ण तयारीनिशी आणि विश्वासानेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान परिषदेचे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी भक्कम पाठबळ असलं तरी गुप्त मतदान होणार असल्याने काही अंशी साशंकताही व्यक्त केली जात आहे. तरीही उद्धव ठाकरे यांनी गद्दारांची मला माहिती आहे, त्यामुळे आता यावेळी गद्दारी कोणी करणार नाही असा विश्वासही त्यानी यावेळी व्यक्त केला आहे.

Published on: Jun 19, 2022 09:53 PM
Special Report | एकनाथ खडसेंच्या वक्तव्याने भाजपच्या गोठात खळबळ
Pandharpur Wari : वर्दीतल्या सिनिअर इन्सपेक्टरचा टाळ मृदुंगाचा गजर, पोलिसाचं हे अनोखं रुप होतंय व्हायरल