‘उध्दव ठाकरे यांनी आधी त्यांच्या आजूबाजच्या रावणांचे दहन करावे’; बांगर यांच्याकडून राऊत यांचा ‘रावण’ असा उल्लेख

| Updated on: Aug 27, 2023 | 2:19 PM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा हिंगोलीत होत आहे. तर शिवसेना फुटीनंतर पहिलीच सभा ही शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मतदार संघात तर ऐतिहासिक रामलीला मैदानावर होणार आहे.

हिंगोली : 27 ऑगस्ट 2023 | शिवसेना पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यात पहिल्यांदा सभा होत आहे. त्यांची हिंगोलीत हाी सभा होणार असून ती ऐतिहासिक रामलीला मैदानावर होईल. सध्या याची तयारी झाली असून शिवसैनिक आणि ठाकरे गटातील अनेक महत्वाचे नेते सभेच्या ठिकाणी पोहचले आहेत. याचदरम्यान त्यांच्या या सभेवरून शिंदे गटाचे नेते आमदार संतोष बांगर यांनी जोरदार टीका केली आहे.

यावेळी त्यांनी शिवसेना हिंगोलीसाठी तरी फुटलेली नाही असं म्हटलेलं आहे. तर शिंदे गटात गेल्यापासून आपण त्यांच्यावर टीका केलेली नाही. तर मी माझ्या कामाच्या जोरावर पुन्हा येथे ताकद दाखवून देईन. ते 2024 मध्ये समोर येईलच. तर ऐतिहासिक रामलिला मैदानात उद्धव ठाकरे हे शिवसेनेतील गद्दारांचा वध करतील अशी टीका ठाकरे गटातील नेते करत आहेत.

त्यावर प्रतिक्रिया देताना, बांगर यांनी, ठाकरे आधी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्याच रावणांचा वध करतील असे म्हटलं आहे. तर हे रावणच ठाकरे यांना काही सुधरू देत नाहीत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर नक्की काय सुरू आहे हे ठाकरे यांना कळालं तर ते निश्चितच त्या रावणांचा वध करतील. तर या सभेचं होणाऱ्या कावड यात्रेवर कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही.

Published on: Aug 27, 2023 02:19 PM
उद्धव ठाकरे यांच्या जंगी स्वागताच्या तयारीला पोलिसांचा ब्रेक, नेमकं कारण काय?
‘खंडोजी खोपडे आणि सुर्याजी पिसाळ यांना लक्षात ठेवत नाहीत’; अंबादास दावने यांचा कोणावर निशाना