Vinayak Raut On Sanjay Raut | संजय राऊतांवर अभिमान असल्याचे विनायक राऊत सांगतात
महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं स्वप्न हे पाहत असतील तर त्याचा चुराडा होईल. येणाऱ्या निवडणुकीत या साडेतीन लोकांना माती चारायची आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
कोल्हापूर : संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. बेईमानीचा अंत होणार आहे. प्रमाणिकपणाचा विजय होणार आहे. आम्हाला संजय राऊत यांचा अभिमान आहे. केंद्र सरकारला भीक घातली नाही. राऊत यांच्या माध्यमातून शिवसेना संपवायची, उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचा डाव होता. संपूर्ण महाराष्ट्र संजय राऊत यांच्या मागे उभा राहील. संजय शिरसाठ पेढे वाटत होता. काय ही औलाद. आमदार, खासदारावर भूक संपली नाही. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं स्वप्न हे पाहत असतील तर त्याचा चुराडा होईल. येणाऱ्या निवडणुकीत या साडेतीन लोकांना माती चारायची आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
Published on: Aug 02, 2022 01:14 AM