दोन नेत्यांच्या हट्टामुळे संपूर्ण देश सरणावर, शिवसेना खासदारानं भाजपला फटकारलं
दोन नेत्यांच्या हट्टामुळे संपूर्ण देश सरणावर, शिवसेना खासदारानं भाजपला फटकारलं
मुंबई: शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. या दोन नेत्यांच्या हट्टामुळे संपूर्ण देश सरणावर गेला. भाजपने बंगालमध्ये गर्दी जमवली. मग आता भाजपचे सगळे पोपट गप्प का बसलेत? कोकणातले पोपट गप्प का, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. काही पोपट नुसतेच बोलतात. त्यांना आता बोलणेही मुश्किल होईल. लोक त्यांना फिरु देणार नाहीत, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.