प्रलोभनांवर आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करुन दाखवतो

| Updated on: Jul 19, 2022 | 9:16 PM

प्रलोभनं आणि दबाव आमच्यावरही आहेत मात्र त्या प्रलोभनांवर आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करुन दाखवतो आणि दबावाला आम्ही झुगारून लावतो अशी टीका संजय राऊत यांनी आज केली.

शिवसेना भाजप युतीचा शब्द पाळला गेला असता तर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. पण भाजपनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची फसवणूक भाजपनंच केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची जेव्हा बैठक व्हायची तेव्हा ते एकनाथ शिंदे हेच आपले मुख्यमंत्री असतील असं स्वतः उद्धव ठाकरे यांनीच सांगितले होते. मात्र त्यावेळी भाजपकडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. माझ्यावर किंवा विनायक राऊत यांच्यावर कोणताही प्रश्न उपस्थित करणं मुळातच चुकीचं आहे. प्रलोभनं आणि दबाव आमच्यावरही आहेत मात्र त्या प्रलोभनांवर आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करुन दाखवतो आणि दबावाला आम्ही झुगारून लावतो अशी टीका संजय राऊत यांनी आज केली.

उद्याची सुनावणी संपूर्ण देशासाठी महत्त्वाची
Rahul Shewale : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत एक तास चर्चा झाली होती, राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट