Special Report | वर्षा राऊतांनाही समन्स, ईडीसमोर राहणार हजर
ही चौकशी आता पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांंच्या ईडीच्या मुक्कामात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत यांच्या ईडी कोठडीतला मुक्काम आता आणखी लांबला आहे कारण ईडीकडून सांगण्यात आले आहे की संजय राऊत यांच्याबद्दल आणखी काही कागदपत्र त्यांच्या हाती लागली आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे तर दुसरीकडे 1 कोटी 8 लाखाचं नवं व्यवहारची माहिती अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या पत्नी यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. प्रवीण राऊत यांच्या बँक खात्यावरून मोठी रक्कम संजय राऊत आणि त्यांची पत्नीच्या खात्यावर व्यवहार झाले आहेत. त्यामुळे ही चौकशी आता पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांंच्या ईडीच्या मुक्कामात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Aug 04, 2022 09:03 PM