Video : भाजप नेत्यांनो, अडीच वर्षे तुम्ही शांत बसा आणि आम्हालाही शांत बसू द्या-संजय राऊत

| Updated on: Apr 01, 2022 | 4:06 PM

“भाजपला मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून त्यांनी शिवेसनेसोबतची युती तोडली. त्यांना वाटतं की राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद हवं आहे, पण महाविकास आघाडीचं ठरलंय. पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री (CM) असेल त्यामुळे भाजपने (BJP) स्वत: ला त्रास करून घेऊ नये, अडीच वर्षे तुम्ही शांत बसा आणि आम्हालाही शांत बसू द्या”,असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. आस्ते कदम भूमिका कोणी घेत […]

“भाजपला मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून त्यांनी शिवेसनेसोबतची युती तोडली. त्यांना वाटतं की राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद हवं आहे, पण महाविकास आघाडीचं ठरलंय. पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री (CM) असेल त्यामुळे भाजपने (BJP) स्वत: ला त्रास करून घेऊ नये, अडीच वर्षे तुम्ही शांत बसा आणि आम्हालाही शांत बसू द्या”,असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत भाजप नेत्यांवरील कारवायांवरून धुसफूस असल्याचं सांगितलं जात आहे.

 

 

Published on: Apr 01, 2022 04:03 PM
Video : उत्तरप्रदेशची निवडणूक संपली आणि पेट्रोलचे दर वाढले – प्रकाश आंबेडकर
गृहविभागावर मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांची नाराजी नाही – Dilip Walse Patil