Shrikant Shinde : जर बाळासाहेब असते तर तुम्ही हे भाषण केलं असतं का? श्रीकांत शिंदे संतापले
Waqf Amendment Bill 2025 : आज संसदेत वक्फ बोर्डाच्या सुधारित विधेयकाला मांडण्यात आलं आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून चर्चा सुरू आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली.
गेल्या 5 वर्षात वक्फच्या जमिनी वाढत गेल्या, पण त्यातून उत्पन्न कमी होत गेलं. इतक्या वर्षात फक्त 163 कोटीचा महसूल सरकारला मिळाला आहे. म्हणजे या सगळ्या वक्फच्या जमिनीवर भ्रष्टाचार किती वाढला आहे? हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आज हे वक्फचं सुधारित विधेयक आम्ही आणलं आहे. त्यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखत आहे, असं शिवसेना खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी संसदेत बोलताना म्हंटलं आहे. आज संसदेत वक्फ बोर्डाच्या सुधारित विधेयकाला मांडण्यात आलं आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून चर्चा सुरू आहे. त्यावेळी भाष्य करताना श्रीकांत शिंदे बोलत होते.
पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, आज वक्फ विधेयक गरीब मुस्लिमांच्या उद्धारासाठी आणले आहे. मी अरविंद सावंतांना विचारेल की, तुम्ही आज वक्फ विधेयकासाठी हिरवा पोशाख घातला आहे का? तुमच्या विवेकाला विचारा की जर बाळासाहेब इथे असते तर ते हे भाषण देऊ शकले असते का? असा प्रश्न देखील यावेळी शिंदेंनी उपस्थित केला आहे. बाळासाहेबांची विचारसरणी स्पष्ट होती- हिंदू धर्माचे रक्षण, देशाचे रक्षण आणि देशासोबत इतर धर्मांचा समावेश. मला वाटतं लोकांना हिंदुत्वाची ऍलर्जी झाली आहे, त्यांना हिंदूंचीही ऍलर्जी झाली आहे. आज ते बोर्डात बिगर मुस्लिम सदस्य असल्याच्या विरोधात निषेध करत आहेत. औरंगजेबाच्या थडग्यावर बोलताना. पालघर साधू हत्या प्रकरणात काय घडले, त्याबद्दल कधीही बोललो नाही, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.