मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला आम्ही जाणार नाही; ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
शिवसेना ठाकरेगटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं ते म्हणालेत. पाहा...
शिवसेना ठाकरेगटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं ते म्हणालेत. “आज मुख्यमंत्री शिंदेंनी खासदारांची बैठक बोलावली आहे. पण आम्ही ठाकरे गटाचे खासदार या बैठकीला जाणार नाही. या बैठकीची चेष्ठा सुरू आहे. या परंपरेला मुख्यमंत्र्यांनी काळं फासलं आहे”, असं विनायक राऊत म्हणालेत. “ही बैठक यापूर्वीच नियोजित केली होती. मात्र ती रद्द करण्यात आली. ही बैठक नेमकी का रद्द करण्यात आली. ती नेमकी का रद्द करण्यात आली याचं कारण सांगण्यात आलं नाही. आज संध्याकाळी साडेपाच वाजता ही बैठक ठेवली आहे दिल्लीला उद्यापासून अर्थसंकल्प सुरू होत आहे. तिथं जाणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या बैठकीत उपस्थित राहणार नाही”, असं विनायक राऊत म्हणालेत.
Published on: Jan 30, 2023 01:24 PM