विदर्भातील शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
शिवसेनेचे नागपूरचे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सुनील ढगे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : शिवसेनेचे नागपूरचे (Nagpur Shivsena) जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 3 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा वासनिक यांनी मानमोडे यांच्या विरोधात तक्रार केली होती. मानमोडे यांनी 3 लाखांची अफरातफर केल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर आता मानमोडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानमोडे (Pramod Manmode) निर्मल उज्जवल बँकेचे संस्थापक आहेत. या बँकेच्या माजी व्यवस्थापकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Sep 27, 2022 08:34 AM