आदित्य ठाकरे यांची नाईटलाइफ संकल्पना मोडीत काढणार, शिवसेना ‘हा’ नवा उपक्रम राबवणार
Aditya Thackeray Nightlife concept : आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाईटलाइफची संकल्पना राबवली होती. आदित्य ठाकरे यांची ही संकल्पनेला मोडीत काढण्यात येतेय. शिवसेनेकडून आता नवा उपक्रम राबवण्यात येत आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मुंबईतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता शिवसेनेकडून नवा उपक्रम राबवण्यात येत आहे. शिवसेनेचा पारंपारिक मतदार असलेल्या कोळी बांधवांपासून पुन्हा पक्षासोबत जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संपूर्ण मुंबईमध्ये ‘जीवाची मुंबई’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. कोळी लोकांची संस्कृती आणि कोळी नृत्यांचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजेनंतर आयोजित करण्यात येणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाईटलाइफची संकल्पना राबवली होती. आदित्य ठाकरे यांची ही संकल्पनेला मोडीत काढण्यात येतेय. मराठमोळं नाईटलाईफ अंमलात आणण्याच्या योजनेवर सध्या विचार सुरू आहे.
Published on: Mar 29, 2023 11:09 AM