Special Report | ठाकरे Vs शिंदे…शिवसेना नेमकी कोणाची?

| Updated on: Jul 06, 2022 | 9:02 PM

उद्धव ठाकरे यांनी आता दौरे चालू केले आहेत, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर टीका करत आपली आहे तिच खरी शिवसेना असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले. आता त्यानंतर खरा वाद चालू झाला आहे. ज्या आमदारांना घेऊन आणि नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीच शिवसेना पक्षावर दावा केला. ज्यामध्ये बंडखोर आमदार आहेत, तिच खरी शिवसेना असा दावाही एकनाथ शिंदे करत आहेत, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना शिवसेना बळकावायची आहे अशी टिकाही त्यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता दौरे चालू केले आहेत, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर टीका करत आपली आहे तिच खरी शिवसेना असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Jul 06, 2022 09:02 PM
एकीकडे राजकारण तापलेय तर दुसरीकडे मात्र भास्कर जाधव शेतीत व्यस्त
Ashish Jaiswal : …याचा उद्धव ठाकरे यांनी गांभीर्यानं विचार करावा, शिवसेनेचे बंडखोर आशिष जैस्वाल यांचा इशारा