Special Report | … तर 16 बंडखोर आमदारच अडचणीत आले असते
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहली झिरवळांच्या नोटीस प्रमाणं शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र घोषित झाले असते जर सोळा आमदार अपात्र झाले असते तर सरकारचं कोसळलं असते.
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या 16 आमदारांचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. शिवसेनेने त्यांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सोळा बंडखोर आमदारांवर निर्णय येईपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असा निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करण्यात येईल, घटनापीठाच्या स्थापनेला काही वेळ लागणार असल्याने त्यामुळं तात्काळ सुनावणी शक्य नाही असंही सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर खासदार अरविंद सावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयानं सेनेच्या याचिकेच्या बाजूनं तात्काळ निर्णय दिला असता तर 16 बंडखोर आमदारच अडचणीत आले असते. म्हणजेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहली झिरवळांच्या नोटीस प्रमाणं शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र घोषित झाले असते जर सोळा आमदार अपात्र झाले असते तर सरकारचं कोसळलं असते.