एकनाथ शिंदेंना सत्ता सोडावी लागणार?
ज्या बंडखोर आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यांनी एकतर कोणत्यातरी पक्षात सामील झाले पाहिजे नाही तर ते शिवसेना पक्षात राहूनच आम्ही शिवसेनेचेच आहोत अन्यथा शिवसेना हा पक्ष आमचाच आहे असं ते म्हणून शकत नाहीत.
भारतीय संविधान सांगते की, ज्या पक्षातून उमेदवारी मिळते, उमेदवार निवडून येतो, त्या पक्षाचाच तो आमदार असतो अशी माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे. शिवेसेनेतून ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे, ते सर्व उमेदवार हे शिवसेनेनेचे आहेत, तर शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. त्यामुळे भारतीय संविधानानुसार हे स्पष्ट होते, की ज्या पक्षातून जे आमदार निवडून आले आहेत त्या पक्षाचे ते आमदार राहतात हे कायदा सांगतो. त्यामुळे ज्या बंडखोर आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यांनी एकतर कोणत्यातरी पक्षात सामील झाले पाहिजे नाही तर ते शिवसेना पक्षात राहूनच आम्ही शिवसेनेचेच आहोत अन्यथा शिवसेना हा पक्ष आमचाच आहे असं ते म्हणून शकत नाहीत.
Published on: Jul 17, 2022 06:51 PM