Special Report | सेना कुणाची ? ठाकरेंची की शिंदेंची ? उद्या फैसला
शिवसेनेने हे प्रकरण न्यायालयात दाखल करताना शिंदे गटाकडेच सोळा आमदार अपात्र ठरवण्याचा दावा न्यायालयात केला आहे, तर अपात्रतेच्या कारवाईतच बहुमताचं आमंत्रण कसं असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे शिवसेनेसह बंडखोर आमदारांचेही लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेनेसाठी आणि कट्टर शिवसैनिकांसाठी उद्याचा म्हणजेच 11 जुलै 2022 हा दिवस महत्वाचा आणि अविस्मरणीय राहणारा आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात केवळ शिवसेनेच्या भवितव्याची नाही, तर देशाच्या लोकशाहीसाठी हा निकाल महत्वाचा असल्याचे मत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. तर लोकशाही आणि न्यायव्यवस्था काय आहे ते उद्या कळणार असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे. सत्तेचा पेच, शिवसेनेतील बंड, बहुमत चाचणी याविरोधात हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे. शिवसेनेने हे प्रकरण न्यायालयात दाखल करताना शिंदे गटाकडेच सोळा आमदार अपात्र ठरवण्याचा दावा न्यायालयात केला आहे, तर अपात्रतेच्या कारवाईतच बहुमताचं आमंत्रण कसं असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे शिवसेनेसह बंडखोर आमदारांचेही लक्ष लागून राहिले आहे.
Published on: Jul 10, 2022 09:28 PM