संजय राऊत यांची टीका म्हणजे मोठा जोक! उद्धव ठाकरेदेखील खळखळून हसत असतील; कुणाचं टीकास्त्र?

| Updated on: Feb 25, 2023 | 1:07 PM

शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांनी खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचाही संदर्भ दिला आहे. पाहा...

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसेनेच्या नेत्याने टीका केली आहे. शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. आज मी पहिल्यांदा संजय राऊतांच्या तोंडून ऐकलंय की, देवेंद्र फडणवीसांना सनसनाटीचा छंद जडलाय. याहून मोठा कुठलाच जोक नाही! उद्धव ठाकरेंनी जर राऊतांचं वक्तव्य ऐकलं असेल तर तेही खळखळून हसले असतील. आता त्यांना त्यांना उपचारांची गरज आहे. आपण कुठे आहोत, याचा जरा अभ्यास करा!, असं शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरे अडीज वर्ष सत्तेत होते. तेव्हा नामांतरावर सभागृहात ठराव का आणला नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या निर्णयाला पाठिंबा दिला नव्हता. आम्ही सत्तेत आलो आणि सहा महिन्यात आम्ही नाव बदललं. त्याचा तुम्ही अभिमान बाळगा, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Published on: Feb 25, 2023 01:05 PM
औरंगाबादचं नाव बलण्याचं श्रेय केवळ ‘या’ दोनच लोकांचं; संजय शिरसाठ यांचा मोठा दावा
Video : बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अन् औरंगाबादचं नामांतर; छगन भुजबळ यांची सविस्तर प्रतिक्रिया…