शिवसेना वाढवण्यासाठी शिळ्या भाकरी खाल्ल्या
ज्यावेळी शिवसेनेकडून घेण्याची वेळ आली त्यावेळी लोकांनी भरुन घेतले मात्र आता द्यायची वेळ आल्यावर मात्र हीच लोकं शिवसेनेला सोडून जात आहेत.
शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना त्यांनी गंगापूरमध्ये सभा घेतली, त्यावेळी त्या सभेचत डोळ्याला रुमाल लावून हमसून हमसून रडणारी एक वयोवृद्ध व्यक्ती दिसते आहे. त्या व्यक्तीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. शिवसेनेबरोबर निष्ठा काय असते असं म्हणून सध्या हा व्हिडीओ शिवसेनेसह अनेक व्यक्ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला जात आहे. त्या वयोवृद्ध व्यक्तीबरोबर म्हणजेच कट्टर शिवसैनिक असलेल्या या काकांबरोबर संवाद साधला आहे. ते म्हणतात की, ज्यावेळी शिवसेनेकडून घेण्याची वेळ आली त्यावेळी लोकांनी भरुन घेतले मात्र आता द्यायची वेळ आल्यावर मात्र हीच लोकं शिवसेनेला सोडून जात आहेत.
Published on: Jul 25, 2022 08:43 PM