Shivsena: शिवसेनेचे खासदारही बंडाच्या मार्गावर?; मातोश्रीवर 19 पैकी 12 च खासदार उपस्थित
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शिवसेना खासदारांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत सेनेचे 19 पैकी फक्त 12 खासदार उपस्थित झाले आहे. सूत्रांच्या मते आमदारानंतर आता खासदारही बंडाच्या वाटेवर असल्याचे कळते. आमदारांच्या नाराजीचा मोठा फटका शिवसेनेला सहन करावा लागला आहे त्यामुळे खासदारांच्या अनुपस्थितीने शिवसेनेची चिंता वाढली आहे. खासदारांनि बंड केल्यास शिवसेनेला NDA […]
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शिवसेना खासदारांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत सेनेचे 19 पैकी फक्त 12 खासदार उपस्थित झाले आहे. सूत्रांच्या मते आमदारानंतर आता खासदारही बंडाच्या वाटेवर असल्याचे कळते. आमदारांच्या नाराजीचा मोठा फटका शिवसेनेला सहन करावा लागला आहे त्यामुळे खासदारांच्या अनुपस्थितीने शिवसेनेची चिंता वाढली आहे. खासदारांनि बंड केल्यास शिवसेनेला NDA च्या राष्ट्रपती उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यसभेच्या 4 खासदारांपैकी 3 खासदारही या बैठकीला उपस्थित आहेत. राज्यसभा आणि लोकसभा मिळून 23 पैकी 15 खासदार या बैठकीला उपस्थित आहेत. राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे या बैठकीसाठी उपस्थित आहेत.
Published on: Jul 11, 2022 03:05 PM