Sanjay Raut : मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे, कुणाल कामरा प्रकरणावरून राऊतांचा टोला

| Updated on: Mar 24, 2025 | 11:43 AM

Sanjay Raut On Kunal Kamara Matter : कॉमेडीयन कुणाल कामरा याने शिंदेगटावर केलेल्या विडंबनपर गाण्यानंतर आता नवीन वाद सुरू झाला आहे. शिंदे गटाने कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

कॉमेडीयन कुणाल कामराला मी आज ओळखत नाही. त्याने यांच्यावर देखील अशा पद्धतीची टीका याआधी केलेली होती. तेव्हा पासून मी त्याला ओळखतो, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. कॉमेडीयन कुणाल कामरा याने शिवसेना शिंदे गटावर गाणं तयार करून विडंबन केलं आहे. त्याचा व्हिडिओ काल संजय राऊत यांनी शेअर केला होता. त्यानंतर आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी आज शिंदे गटावर टीका केली.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. जोवर टीका वैयक्तिक पातळीवर केली जात नाही तोवर तुम्हाला अशा राजकीय विचारधारेवर झालेल्या टीकेचा स्वीकार करायला हवा. हीच लोकशाही आहे. कुणाल कामराचं ऑफिस, स्टुडिओची तोडफोड केली, ही गुंडागर्दी आहे. नागपूर राड्यात झालेल्या नुकसानीची भरपाई आरोपींकडून केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मग काल खारमध्ये जी तोडफोड झाली त्याची भरपाई कोण करेल? असा प्रश्न उपस्थित करत अत्यंत कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे, अशी खोचक टीका यावेळी संजय राऊत यांनी केली आहे.

Published on: Mar 24, 2025 11:38 AM
Ajit Pawar Video : ‘ते कधी निवडून…’, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला
Kunal Kamra Video : कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील ‘या’च गाण्यामुळं पेटला वाद