राज्यपाल कोश्यारीजी, आधी माफी मागा अन् मगच कोल्हापुरात पाय ठेवा; ठाकरेगट आक्रमक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी ठाकरेगटाने जेलभरो आंदोलन सुरु केलं आहे. राज्यपाल कोश्यारी चले जाव!, अशा घोषणा देण्यात येत आहेत.
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी ठाकरेगटाने जेलभरो आंदोलन सुरु केलं आहे. शिवाजी विद्यापीठाच्या गेटवर ठाकरे गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आहे. राज्यपाल कोश्यारी चले जाव!, अशा घोषणा देण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी, आधी माफी मागा अन् मगच कोल्हापुरात पाय ठेवा, असा इशारा देण्यात आलाय. 16 फेब्रुवारीला होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आमंत्रित करण्यात आलंय. मात्र कोशारी यांना ठाकरेगटाने विरोध केलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा ठाकरे गटाने इशारा दिलाय. विरोध दर्शवण्यासाठी आज ठाकरेगटाकडून जेलभरो आंदोलन करण्यात येतंय.
Published on: Feb 11, 2023 12:38 PM