पंढरी आंबेरकर, सौदी अरेबियाच्या कंपनीची गुंतवणूक; शशिकांत वारिसे हत्या प्रकरणी संजय राऊतांचं महत्वाचं ट्विट
खासदार संजय राऊत यांनी शशिकांत वारिसे हत्या प्रकरणासंदर्भात महत्वाचं ट्विट केलं आहे. यात त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शशिकांत वारिसे हत्या प्रकरणासंदर्भात महत्वाचं ट्विट केलं आहे. यात त्यांनी एका गाडीचा फोटो शेअर केला आहे. “ही पंढरी आंबेरकरची गाडी, त्याच्या मागच्या बाजूस रिफायनरी कंपनी RRPCL चा लोगो आहे,ह्या कंपनीत ‘सौदी अरेबिया’च्या कंपनीची गुंतवणूक आहे. शशिकांत वारिसे यांची हत्या हे एक षडयंत्र आहे. आंबेकर अंगणेवडी जत्रेत हजर होता.अनेक नेत्यांना भेटला. ते नेते कोण? दुसऱ्या दिवशी शशिकांत मारला गेला”, असं ट्विट राऊतांनी केलं आहे.
Published on: Feb 12, 2023 02:06 PM