…तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची चौकशी कोण करणार?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

| Updated on: Apr 17, 2023 | 8:05 AM

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय. तर 24 जणांवर नवी मुंबईच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी सरकारला सवाल विचारलाय. पाहा...

नवी मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात उष्मघातामुळे श्रीसदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. तर 24 जणांवर नवी मुंबईच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या श्रीसदस्यांची काल रात्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी भेट घेतली. तेव्हा त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. जर अमित शाहांना जायचं होतं म्हणून जर संध्याकाळचा कार्यक्रम दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कुणी करायची?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. आम्हाला सांगितलेला मृतांचा आकडा 11 आहे. पण हा आकडा दुर्देवाने वाढूही शकतो, असंही ते म्हणालेत.

Published on: Apr 17, 2023 08:05 AM
रोगराई आल्यावर तर लोकांना हे सरकार वाऱ्यावर सोडलं; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची सडकून टीका
मर्द असाल तर मैदानात या…, उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता कुणावर टीकास्त्र