Shivsena: बंडखोर मंत्र्यांची खाती उद्धव ठाकरेंनी काढून घेतली ;कुणाकडे दिली ही जबादारी
गुलाब पाटील यांच्याकडील खाते अनिल परब यांच्याकडे देण्यात आले आहे. तर दादा भुसे यांच्याकडील खाते संदीपान भुमरे यांच्याकडं देण्यात आली आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण हे खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढल्याची घोषणा शिवसेनेतून (Shivsena)निघून बंडखोरी केलेल्या आमदारांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात महाविकास आघाडीतून(Mahavikas aghadi government) अनेक आमदार बाहेर पडले आहेत. मात्र या बंडखोर आमदारांना दणका देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांकडे असलेली मंत्रीपदे काढून घेतली आहेत. एकनाथ शिंदे (Eknath shinde )यांच्याकडील नगरविकास व बांधकाम खाते सुभाष देशमुख यांच्यकडे देण्यात आले आहे. गुलाब पाटील यांच्याकडील खाते अनिल परब यांच्याकडे देण्यात आले आहे. तर दादा भुसे यांच्याकडील खाते संदीपान भुमरे यांच्याकडं देण्यात आली आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण हे खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
Published on: Jun 27, 2022 02:33 PM