सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतलं; शिवसेनेच्या नेत्याचा आरोप
Vijay Shivtare on Supriya Sule : शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या देवदर्शनावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पाहा...
पुणे : राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतलं, असा आरोप शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. मटण थाळीचा एक व्हीडिओ आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये आज मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं. आधी महादेव मंदिरात आणि सासवडला सोपानकाका यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, असं शिवतारे म्हणाले आहेत. “आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या.सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला ||”, अशी पोस्ट शिवतारे यांनी फेसबुकवर केली आहे.
Published on: Mar 05, 2023 08:43 AM