Shivsena Vs Eknath shinde: आमची कायदेशीर बाजू मजबूत- संजय राऊत

Shivsena Vs Eknath shinde: आमची कायदेशीर बाजू मजबूत- संजय राऊत

| Updated on: Jul 11, 2022 | 3:22 PM

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सवोचच न्यायालय या देशामध्ये कायद्याची व घटनेची पायमल्ली होऊ देणार नाही जे घटनेला मान्य आहे त्यानुसार न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शिंदे गटाकडून आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. […]

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सवोचच न्यायालय या देशामध्ये कायद्याची व घटनेची पायमल्ली होऊ देणार नाही जे घटनेला मान्य आहे त्यानुसार न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शिंदे गटाकडून आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे एकीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणी सुरू असताना हा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, यासाठी ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग ठाकरे गटाच्या मागणीवरती काय निर्णय घेणार? याकडेही राज्यातल्या राजकारणाची पुढची दिशा अवलंबून असणार आहे.

 

Published on: Jul 11, 2022 03:22 PM
Shivsena: शिवसेनेचे खासदारही बंडाच्या मार्गावर?; मातोश्रीवर 19 पैकी 12 च खासदार उपस्थित
Ashok Chavan News : खरंच अशोक चव्हाणांनी भाजपला मदत केली? कोणी दिली चव्हाणांना भाजपमध्ये येण्याची ऑफर? पडद्यामागून मदत केल्याने कोणी मागितले जाहीर आभार