‘फुट जायेगा एक दिन टरबूज, रहेगा रिक्षा खाली’, महिलांनी उडविली कुणाची खिल्ली?
शिवसेनेचे राज्य येणार. शिवसेनेचे सरकार येणार. आम्ही निष्ठावंत अजूनही जागेवर आहोत. ज्यांनी शिवसेनेला बनवले, ज्या शिवसैनिकानी त्यांना नेता, आमदार बनवले. पण, ते पळाले आणि गद्दार झाले.
मुंबई | 24 ऑक्टोंबर 2023 : शिवाजीपार्क येथे ठाकरे गटाच्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थिती लावली. येथे येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांच्या रडारवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. भिवडी येथूनही काही महिला शिवसैनिक या सभेला आले होते. ‘फुट जायेगा एक दिन टरबूज, रहेगा रिक्षा खाली’ असा टोला या महिलांनी गाण्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप नेते फडणवीस यांना लगावला. गद्दार यांचा रिक्षा खाली होणार. २०२४ ला उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री पुन्हा होणार. शिवसेनेचे राज्य येणार. शिवसेनेचे सरकार येणार असा दावा या महिलांनी केला. गद्दार पळाले पण आम्ही निष्ठावंत अजूनही जागेवर आहोत. ज्यांनी शिवसेनेला बनवले, ज्या शिवसैनिकानी त्यांना नेता, आमदार बनवले. पण, ते पळाले आणि गद्दार झाले. पण आम्ही निष्ठावंत अजूनही आहोत तिथेच आहोत. निवडणुकीत आमचाच विजय होणार असेही या महिलांनी ठणकावून सांगितले.