नाशिकच्या तपोवन कॉर्नरमध्ये शिवशाही बसचा अपघात
सकाळच्या सुमारास शिवशाही (Shivshahi) बस नाशिकहुन औरंगाबादकडे (Aurangabad) जात असताना उड्डाणपुलाच्या खाली हा अपघात झाला.
नाशिकच्या (Nashik) तपोवन कॉर्नर भागात शिवशाही बसचा अपघात झाला आहे.सकाळच्या सुमारास शिवशाही (Shivshahi) बस नाशिकहुन औरंगाबादकडे (Aurangabad) जात असताना उड्डाणपुलाच्या खाली हा अपघात झाला. बस चालकाचा बस वरील ताबा सुटल्यानं बस थेट उड्डानपुलाच्या खांबावर अदळली.दरम्यान या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला आहे, तर शिवशाही बस मधील काही प्रवासी जखमी झाले आहेत..औरगाबाद नाका परिसरात वारंवार होणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी वाहतुक पोलीस कायमस्वरुपी तैनात करावेत अशी मागणी होते आहे.