धक्कादायक! पुण्यात 900 किलो भेसळयुक्त पनीर आणि शेकडो किलो दुधाची पावडर जप्त
गणेशोत्सवात पनीर आणि दुधाच्या पदार्थांना विशेष मागणी असते. याचा फायदा घेत नफा खोरी करण्यासाठी भेसळयुक्त पनीर बनविण्यात आले होते.
गणेशोत्सवादरम्यान पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 900 किलो भेसळयुक्त पनीर आणि 550 किलो दुधाची पावडर जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. गणेशोत्सवात पनीर आणि दुधाच्या पदार्थांना विशेष मागणी असते. याचा फायदा घेत नफा खोरी करण्यासाठी भेसळयुक्त पनीर बनविण्यात आले होते. या धक्कादायक प्रकारानंतर पुणेकरांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
Published on: Sep 06, 2022 11:51 AM