Shrikant Shinde : ‘ट्रेलर’नेच धडकी भरली?… पिक्चर अभी बाकी है’!!! श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांना डिवचलं

| Updated on: Sep 04, 2022 | 2:46 PM

हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली?… पिक्चर अभी बाकी है’!!!, असं सूचक विधान श्रीकांत शिंदे यांनी ट्विटमधून केलं आहे. अजित पवार यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांना शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून डिवचले होते.

ठाणे : दादा, हा पहाटेचा फ्लॉप शो नाही. हा शोले आहे, शोले, असं म्हणत श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)  यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा… हा ‘शो’ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा! आणि हो… हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली?… पिक्चर अभी बाकी है’!!!, असं सूचक विधान श्रीकांत शिंदे यांनी ट्विटमधून केलं आहे. अजित पवार यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांना शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून डिवचले होते. शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतल्या. शिवसेना प्रमुखांच्या उपस्थित प्रत्येक दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याच्या सभा झाल्या. पण आता ज्यांच्या हातात पॉवर आहे, ते पाहिजे तशा गोष्टी करतात. जनता कोणाच्या पाठीशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच कळेल. निवडणूक झाल्यानंतर कळेल कोणाची शिवसेना खरी, असा टोला अजित पवार यांनी शिंदेंना लगावला होता.

Published on: Sep 04, 2022 02:46 PM
VIDEO : Solapur महापालिकेचा हलगर्जीपणा, ड्रेनेजचे पाणी गणेश मंडळात शिरल्याने नागरिक संतत्प
Gopichand Padalkar : पवार कुटुंब सोडून कुणी मोठं झालेलं त्यांना पाहावत नाही, पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका