प्रतिक्षा संपली, महायुतीचा कल्याणच्या जागेचा तिढा सुटला, अशी होणार लढत

| Updated on: Apr 06, 2024 | 12:13 PM

कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून कल्याण मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अशातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. महायुतीचा कल्याणच्या जागेचा तिढा सुटला आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच लढणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरकेर यांच्यामध्ये लढत होणार असून सध्या भारतीय जनता पार्टी श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहणार असून त्यांचा प्रचार देखील करणार आहे. गेल्या निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीमध्ये त्यांचा अधिक मतांनी विजय होईल. त्यासोबतच महायुतीमधील सर्व पक्ष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, रासपा, रिपाई असे सर्व घटकपक्ष श्रीकांत शिंदे यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बोलताना म्हटलं आहे

Published on: Apr 06, 2024 12:10 PM
बाळ्या मामा म्हात्रे यांच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा
शिवाजीनगर भागातील पाणी पुरवठा विस्कळीत, पुण्यात ‘नो वॉटर नो वोटचे बॅनर’