राहुल कनाल शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? श्रीकांत शिंदे यांचं सूच वक्तव्य; म्हणाले…
ठाकरे गटातली गळती काही थांबायचं नाव घेत नाही आहे. आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले युवासेनेचे नेते राहुल कनाल हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागली आहे. या चर्चांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
मुंबई : ठाकरे गटातली गळती काही थांबायचं नाव घेत नाही आहे. आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले युवासेनेचे नेते राहुल कनाल हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागली आहे. राहुल कनाल नाराज असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ते युवासेनेच्या कोअर कमिटीच्या व्हाट्सअॅप ग्रुपवरुन लेफ्ट झाले, अशी माहिती समोर आली होती.राहुल कनाल यांनी, “मी माझा निर्णय लवकरच जाहीर करेन”, असं म्हटलं आहे. या चर्चांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा जनाधार आणि विश्वास दररोज वाढतोय. नवी माणसं रोज मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जोडली जात आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरु आहे,” अशी सूचक प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी राहुल कनाल यांच्या प्रश्नावर दिली आहे.