सत्यजित तांबेंना टफ लढत देणाऱ्या शुभांगी पाटील ठाकरेगटात; शिवबंधन बांधल्यावर म्हणाल्या…
शुभांगी पाटील यांनी आज शिवसेनेच्या ठाकरेगटात प्रवेश केला. मातोश्रीवर जात त्यांनी शिवबंधन हाती बांधलं. पाहा..
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. या अटीतटीच्या सामन्यात सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील अशी लढत झाली. दोन्ही उमेदवार अपक्ष लढत होते. पण शुभांगी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. या निवडणुकीत शुभांगी पाटील पराभूत झाल्या तर सत्यजित तांबे यांचा विजय झाला. या सगळ्यानंतर शुभांगी पाटील यांनी आज शिवसेनेच्या ठाकरेगटात प्रवेश केला. मातोश्रीवर जात त्यांनी शिवबंधन हाती बांधलं. ज्यांनी-ज्यांनी या निवडणुकीत मदत केली त्या साऱ्यांचे शुभांगी पाटील यांनी या पक्षप्रवेशानंतर आभार मानलेत.
Published on: Feb 04, 2023 02:47 PM