म्हणून मी सत्यजीत तांबे यांना हात जोडले; मविआने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचं विधान
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराने सत्यजीत तांबेंना हात का जोडले? पाहा...
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होतेय. या निवडणुकीतील उमेदवारीवरून विविध घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीने अखेर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. त्यानंतर शुभांगी यांनी सत्यजीत तांबेंसमोर हात जोडले. असं का केलं त्याचं कारण शुभांगी यांनी सांगितलं.”सत्यजीत तांबे यांना मी काल हात जोडले. प्रत्येक व्यक्ती आपल्यासमोर ग्रेट आहे, म्हणून मी त्यांना हात जोडले”, असं शुभांगी म्हणाल्या.